फलटण लाइफलाईन हॉस्पिटल प्रा. लि.,फलटण.          फलटण आरोग्य मंडळ संचलित येथील श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब रौप्य महोत्सवी रुग्णालय उभारणीला सुमारे ८७ वर्षांचा कालावधी लोटला असून या ८७ वर्षांत राजघराण्यातील ३ पिढ्यांनी या रुग्णालयाच्या माध्यमातून फलटण ८४ मधील शेतकरी , कामगार , दिनदलित दुबळ्याना उत्तम वैद्यकीय सेवा सुविधा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

      श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब आणि श्रीमंत सौ. लक्ष्मीदेवी राणीसाहेब हे स्वतः दवाखान्याकडे लक्ष देत असल्याने आणि अन्यत्र बाळंतपणाची सुविधा उपलब्ध नसल्याने फलटण शहर आणि ग्रामीण भागातील हे एकमेव प्रसुतीगृह उपलब्ध होते. येथे बाळंतपणासाठी येणाऱ्या महिलांसाठी दर्जेदार वैद्यकीय सेवा तर उपलब्ध होत्याच , त्याचबरोबर अत्यंत स्वच्छता आणि उत्तम व्यवस्थापनाद्वारे आदर्श दवाखाना म्हणून या रुग्णालयाची ख्याती होती. येथे बाळंतपणासाठी दाखल झालेल्यांना कसदार भोजन सुविधा उपलब्ध देण्यासाठी त्याकाळी अन्नपूर्णा भोजनालय अधिकारगृह इमारतीत सुरु करण्यात आले होते. श्रीमंत सौ. राणीसाहेब महाराज सुतीकागृह आणि अन्नपूर्णा भोजनालयाच्या व्यवस्थेकडे बारकाईने लक्ष देत असल्याने तेथे कधीहि कशाची कमतरता जाणवली नाही. परिणामी अत्यंत उत्तम रुग्णालय म्हणून हे रुग्णालय सर्वांनाच एक आधार वाटत होता.

      श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब आणि श्रीमंत सौ. लक्ष्मीदेवी राणीसाहेब हे स्वतः दवाखान्याकडे लक्ष देत असल्याने आणि अन्यत्र बाळंतपणाची सुविधा उपलब्ध नसल्याने फलटण शहर आणि ग्रामीण भागातील हे एकमेव प्रसुतीगृह उपलब्ध होते. येथे बाळंतपणासाठी येणाऱ्या महिलांसाठी दर्जेदार वैद्यकीय सेवा तर उपलब्ध होत्याच , त्याचबरोबर अत्यंत स्वच्छता आणि उत्तम व्यवस्थापनाद्वारे आदर्श दवाखाना म्हणून या रुग्णालयाची ख्याती होती. येथे बाळंतपणासाठी दाखल कसदार भोजन सुविधा उपलब्ध देण्यासाठी त्याकाळी अन्नपूर्णा भोजनालय अधिकारगृह इमारतीत सुरु करण्यात आले होते. श्रीमंत सौ. राणीसाहेब महाराज सुतीकागृह आणि अन्नपूर्णा भोजनालयाच्या व्यवस्थेकडे बारकाईने लक्ष देत असल्याने तेथे कधिही कशाची कमतरता जाणवली नाही. परिणामी अत्यंत उत्तम रुग्णालय म्हणून हे रुग्णालय सर्वांनाच एक आधार वाटत होता.

      १९५३ साली श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या राज्यकारभाराची २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज , प्रशस्त ईमारत बांधण्यात आली. या ईमारतीचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांच्या हस्ते दि. २३ जानेवारी १९५३ रोजी समारंभपूर्वक करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांनी स्विकारले होते. या नंतरच्या काळात श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी रुग्णालयाची जबाबदारी स्विकारून ते उत्तम प्रकारे चालवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

      मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मदतीने अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा रास्त दरात फलटण वासियांना पुरविण्याचे शिव धनुष्य या डॉक्टर समुहाने उचलले आहे.सुमारे ८७ वर्षांपूर्वी झालेल्या श्रीमंत सागुणामाता सुतिकागृह तथा महिलामंडळ दवाखान्यात अमुलाग्र बदल करण्यात आले असून आज तेथे डायलिसीस , एम आर आय , सिटी स्कॅन , कलर डॉपलर, कार्डियाक अॅम्बुलन्स, कॅथ लॅब या अत्याधुनिक सुविधांसह उत्तम ऑपरेशन थिएटर , १८ बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग(आयसीयु) उपलब्ध असून डॉ. संजय राउत , डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य , डॉ. मेघना बर्वे , डॉ. सागर गांधी व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे.


Copyright 2020. PLLH-PHALTAN, All Rights Reserved.

Developed by Digicore Services