CSS transforms are not supported in your browser CSS transitions are not supported in your browser Sorry, only modern browsers.

Snow
  • श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर


  • श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर
  • श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
  • श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर
  • श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर


फलटण लाइफलाईन हॉस्पिटलच्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे.

      फलटण लाईफलाईन हॉस्पिटल हे फलटण मधील पहिले मलटीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. फलटण आरोग्य मंडळाने विचारपूर्वक निर्णय घेऊन अत्यंत वेगाने प्रगत होणाऱ्या वैद्यकीय तंत्रज्ञाचा लाभ फलटण परिसरातील जनतेला व्हावा या दृष्टीने फलटण लाईफलईन हॉस्पिटलमध्ये डायलिसिस , कलर डॉपलर, कार्डियाक अॅम्बुलन्स, सिटी स्कॅन व कॅथ लॅब यासारख्या अनेक सुविधा फलटण येथील नामवंत डॉक्टरांबरोबर एका छताखाली आणल्या. श्रीमंत मालोजीराजे - राजेसाहेब फलटण रौप्य महोत्सव रुग्णालय आणि फलटण आरोग्य मंडळ संचलित फलटण लाईफलाईन हॉस्पिटल प्रा. लि. ; फलटणचे तसेच तेथील कॅथ लॅब सुविधेचे उद्घाटन मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि प्रख्यात हृदय शल्यविशारद मा. डॉ. रणजीत जगताप, पुणे यांच्या हस्ते मंगळवार दि. २५ ऑग्स्ट २१०५ रोजी सामारंभपूर्वक झाले.

       मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मदतीने अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा रास्त दरात फलटण वासियांना पुरविण्याचे शिव धनुष्य या डॉक्टर समुहाने उचलले आहे. फलटण , पुणे , सातारा , बारामती मधील नामवंत तज्ञ डॉक्टरांचे सहकार्याने हे निश्चित यशस्वी होतील अशी खात्री आहे. आज फलटण आरोग्य मंडळ आणि लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून १८ बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग(आयसीयु) आहे. तसेच उत्कृष्ट ऑपरेशन थिएटर आहे. या सर्व सुविधांमुळे रुग्णांना एका छताखाली सर्व सोयी उपलब्ध होतात. फलटण आरोग्य मंडळ आणि लाईफलाईन हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ प्रशिक्षित आहे. या हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ प्रशिक्षित असल्यामुळे सर्वजण रूग्णांची अतिशय काळजीपूर्वक आणि तत्परतेने देखभाल करतात. त्यामुळे रूग्णांची आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाते आणि रुग्ण लवकर बरा होतो. स्वच्छतेची बाब गंभीर असल्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा हॉस्पिटलच्या स्टाफकडून विशेष काळजी घेतली जाते. शाप्रकारे प्रत्येक बाबतीत हॉस्पिटलच्या प्रशिक्षित स्टाफकडून काळजी घेतली जात असल्यामुळे हे हॉस्पिटल सर्व रूग्णांना एक आधार वाटते. या हॉस्पिटलच्या आवारात २४ तास अविरत सेवा देणारे मेडीकल स्टोर आहे. या मेडीकल स्टोरमध्ये सर्व प्रकारची औषधे रास्त दारात उपलब्ध असतात. त्यामुळे रुग्णांना औषधे आणण्यासाठी बाहेर जाण्याची गरज पडत नाही. हे मेडीकल स्टोर २४ तास सुरु असल्यामुळे रुग्णांना कोणत्याही वेळी औषधे उपलब्ध होऊ शकतात. फलटण लाईफलाईन हॉस्पिटलची सुसज्ज कार्डियाक अॅम्बुलन्स २४ तास त्वरित उपलब्ध असते.

       फलटण आरोग्य मंडळ आणि लाईफलाईन हॉस्पिटलला पुणे , सातारा , बारामती मधील नामवंत तज्ञ डॉक्टरांचे सहकार्य लाभत असल्यामुळे फलटण मधील रूग्णांना उपचारासाठी पुणे , सातारा , बारामती येथे जाण्याची गरज पडत नाही. यामुळे फक्त फलटणमधीलाच नव्हे तर फलटण जवळच्या लहान गावांमधील रुग्णांनासुधा या सेवेचा खूप लाभ झाला आहे. मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांना वीज , पाणी , रस्ते , आरोग्य या मुलभूत सुविधा तसेच कृषी , संगणक आणि अभियांत्रिकी शिक्षणाबरोबर सर्व वैद्यकीय सेवा एकाच छताखाली मिळाव्यात म्हणून अतिशय बारकाईने लक्ष दिले. त्यामुळे हे हॉस्पिटल सर्व आजारांसाठी एक खात्रीशीर , काळजीपूर्वक आणि अचूक इलाज आणि सेवा देणारे हॉस्पिटल म्हणून नावारूपाला आले आहे.

       सुमारे ८७ वर्षांपूर्वी झालेल्या श्रीमंत सागुणामाता सुतिकागृह तथा महिलामंडळ दवाखान्यात अमुलाग्र बदल करण्यात आले असून आज तेथे डायलिसीस , एम आर आय , सिटी स्कॅन , कलर डॉपलर, कार्डियाक अॅम्बुलन्स , कॅथ लॅब या अत्याधुनिक सुविधांसह उत्तम ऑपरेशन थिएटर , १८ बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग(आयसीयु) उपलब्ध असून डॉ. संजय राउत , डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य , डॉ. मेघना बर्वे , डॉ. सागर गांधी व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे.


Copyright 2020. PLLH-PHALTAN, All Rights Reserved.

Developed by Digicore Services